लेक लाडकी योजना महाराष्ट्र आता प्रत्येक मुलींना मिळणार 98000 हजार रुपये
लेक लाडकी योजना महाराष्ट्र आता प्रत्येक मुलींना मिळणार 98000 हजार रुपये!
नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र शासनाणे लेक लाडकी योजना ची नुकतीच घोषणा केली आहे. यामध्ये आपण , पात्रता, लाभ, अर्ज करण्याची पद्धत, संपूर्ण माहिती, लेक लाडकी योजना काय आहे, कागदपत्रे, नोंदणी, लाभार्थी, ऑनलाइन अर्ज, अधिकृत वेबसाइट,हेल्पलाईन क्रमांक हे सर्व आपण या लेख मध्ये पाहणार आहोत. त्यामुळे आपणास विनंती आहे कि हा लेख संपूर्ण वाचा.
अनेक राज्य सरकारने महिला व मुलींसाठी महत्वाच्या योजना आणल्या आहेत. अनेक योजनांच्या माध्यमातून मुलींना व महिलांना आर्थिक मदतही केली जात आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने 2023-24 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात लेक लाडकी योजना सुरू करण्याची घोषणा नुकतीच केली आहे.
या योजनेत मुलींच्या जन्मापासून ते वयाच्या 18 वर्षां पर्यंत आर्थिक मदत दिली जाईल. 18 व्या वर्षी 75 हजार रुपये मिळतील, लेक लाडकी योजनेंतर्गत मुलीच्या जन्म झाल्यानंतर ५,0०० [पाच हजार] रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. त्याच बरोबर मुलगी पहिल्या वर्गात गेल्यानंतर तिला सरकारकडून चार हजार रुपये दिले जातील.
अशाच नवीन अपडेट्स साठी आमच्या YouTube चानेल ला Subscribe करा
तसेच सहावीच्या वर्गात गेल्यानंतर मुलीला सहा हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. अकरावीत गेल्यावर त्या मुलीला आठ हजार रुपये मिळतील. त्याच वेळी मुलगी 18 वर्षांची झाल्यावर तिला महाराष्ट्र शासनाकडून 75 हजार रुपये मिळतील.'lek ladki yojana'
पिवळे आणि केशरी रेशन कार्डधारकांना महाराष्ट्र शासनाच्या लेक लाडकी योजना 2023 चा लाभ घेता येणार आहे. मुलीच्या पुढील शिक्षणासाठी पैसे थेट मुलीच्या बँक खात्यात जमा केले जातील. योजनेंतर्गत मुलीचा जन्म सरकारी किवा खाजगी रुग्णालयातच झाला पाहिजे.
लाभ घेण्यासाठी मुलीचा जन्म दाखला सरकारी किवा खाजगी रुग्णालयचा पाहिजे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी केवळ महाराष्ट्र राज्यातील कुटुंबेच पात्र असतील. त्याचबरोबर योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या पालकांचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
लेक लाडकी योजनेची संपूर्ण माहिती
मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत 2023-24 चा अर्थसंकल्प सादर करताना राज्यातील मुलींना शिक्षणात प्रोत्साहन देण्यासाठी नवीन योजना सुरू करण्याची घोषणा केली. लेक लाडकी योजना असे या योजनेला नाव देण्यात आले आहे.
या योजनेच्या माध्यमातून समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना महाराष्ट्र शासनाकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे. लेक लाडकी योजनें मध्ये मुलीच्या जन्मापासून तर तिच्या शिक्षणापर्यंत आर्थिक मदत महाराष्ट्र शासनाकडून केली जाईल.
या मध्ये मुलगी अठरा वर्षाची पूर्ण होई पर्यंत ही आर्थिक मदत सरकार कडून केली जाईल. लेक लाडकी योजना विशेषतः राज्यातील मुलींसाठी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना आर्थिक मदत देली जाणार आहे. 'लेक लाडकी योजना'
यामुळे राज्यातील महिला सक्षमीकरणाला अधिक चालना मिळू शकते. या योजनेचा लाभ कसा घ्यावा, कोण पात्र आहे या सर्व माहितीसाठी तुम्हाला हा लेख शेवटपर्यंत वाचावा लागेल.
लेक लाडकी योजना महाराष्ट्र २०२३
महाराष्ट्र राज्यामध्ये ह्या वर्षीच्या अर्थसंकल्प मध्ये महिलेसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या. त्यापैकी एक म्हणजे लेक लाडकी योजना होय. ह्या योजनेमध्ये किती रक्कम मिळू शकते सविस्तर जाणून घ्या.
लाभ घेण्यासाठी कागदपत्रे?
- मुलीचे आधार कार्ड
- आई-वडिलाचे आधार कार्ड
- उत्पन प्रमाणपत्र
- रहिवासी प्रमाणपत्र
- कुटुंबाचे पिवळे किवा केशरी राशन कार्ड
- मुलीचे बँक खाते पासबुक किवा आईवडिलाचे बँक खाते
- पासपोर्ट साईज फोटो
कसा मिळणार लाभ?
ह्या योजनेमध्ये मुलीच्या जन्मानंतर ५०००/- रुपये मुलीच्या आई किवा वडील यांच्या नावावर जमा होतील. त्यानंतर इयत्ता ४ थी मध्ये मुलगी गेल्यानंतर ४०००/- आणि इयत्ता ६वि मध्ये मुलगी गेल्यानंतर ६०००/- रुपये तसेच ११वि मध्ये मुलगी गेल्यानंतर ८०००/- रुपये मुलीच्या बँक खात्यात महाराष्ट्र शासनाद्वारे जमा करण्यात येतील. त्याचप्रमाणे मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर ७५०००/- रुपये रोख किवा बँक खात्यात महाराष्ट्र शासनाद्वारे हि रक्कम वर्ग करण्यात येणार आहे.
कोणाला मिळणार लाभ?
लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील रहिवासी असावा लागतो. तसेच पिवळे किवा केशरी राशनकार्ड धारक कुटुंबातील मुलींनाच मिळणार आहे.ह्या योजनेत विशीष्ट वयोगटातील मुलीना ठराविक रक्कम देण्यात येणार आहे.
लाभार्थी : महाराष्ट्र राज्यातील मुली.
अधिकृत वेबसाईट : लवकरच अपडेट येईल.
हेल्पलाईन : लवकरच अपडेट येईल.
तर ही होती लेक लाडकी योजना संबंधी महत्त्वाची अशी माहिती, हा लेख जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणींना व शेतकरी बाधवानां नक्की शेअर करा. आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

0 Comments
this is not gov website